देशनवी दिल्ली

देशभरात कोरोनाचा कहर वाढला:24 तासात 40 हजाराची नोंद

नवी दिल्ली : भारतात करोनाचा शिरकाव झाल्यापासून पहिल्यांदाच कोरोनाबाधितांच्या रुग्णांची संख्या विक्रमाने समोर आली आहे. मागील २४ तासांत देशात तब्बल ४० हजार ४२५ नवे करोनाबाधित आढळले असून, ६८१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ११ लाख १८ हजार ०४३ वर पोहचली आहे.


३ लाख ९० हजार ४५९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर आतापर्यंत सात लाखांपेक्षा जास्त जणांनी करोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत २७ हजार ४९७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. देशातील रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत असताना करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये २३ हजार ६७२ रुग्ण करोनामुक्त झाले असून या आजारातून बरे झालेल्यांची संख्या ७ लाखांपेक्षा जास्त आहे. रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ६२.८६ टक्के आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. सध्या देशात दहा लाख लोकसंख्येमागे सुमारे दहा हजार चाचण्या केल्या जात आहेत, असेही सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *