बीड शहरातल्या दोन भागात संचारबंदी लागू
बीड
बीड शहरातील बार्शी नाका भागात आणि संत नामदेव नगर भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे या दोन भागातील दुधाळ कॉलनी आणि माऊली कॉलनी याठिकाणी अनिश्चित कालावधीसाठी संचारबंदी लागू करण्यात आल्याचे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिले आहेत
बीड शहरातील बार्शी नाका भागात दुधाळ कॉलनी या ठिकाणी कोरोना विषाणू ची लागण झालेला रुग्ण आढळून आला आहे त्यामुळे गोवर्धन वळे यांच्या घरापासून मोमीन मुक्तार गुलाम खाजा यांच्या घरापर्यंत कंटेनमेंट घेऊन घोषित करून या ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे तसेच बीड शहरातील माऊली कॉलनी संत नामदेव नगर याठिकाणी कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यामुळे अर्जुन जाधव यांच्या घरापासून बालाजी पतंगे यांच्या घरापर्यंत कंटेनमेंट झोन घोषित करून या ठिकाणी देखील अनिश्चित कालावधीसाठी संचारबंदी लागू केल्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिले आहेत