कोरोना रुग्णांबाबतची माहिती तातडीने आरोग्य विभागास द्या:खाजगी रुग्णालयाला निर्देश
बीड, दि, 16, बीड जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणू बाधित रुग्ण covid-19 वाढत असून रुग्णांचे संपर्क तपास केले (contract tracing ) असता रुग्णांनी खाजगी दवाखाना मध्ये उपचार घेतले असल्याबाबत निदर्शनास येत आहे जिल्ह्यातील काही वैद्यकीय व्यावसायिक वेळेवर तत्परतेने कोरोना रुग्णांची माहिती देतात .तर बहुतांशी वैद्यकीय व्यावसायिक व खाजगी औषध विक्रेते आरोग्य विभागास ही माहिती वेळेवर देत नाहीत असून ही बाब अत्यंत गंभीर आहे. हे निदर्शनास आले असल्याने खाजगी औषध विक्रेते वैद्यकीय व्यवसायिक यांनी कोरोना रुग्णांची माहिती आरोग्य विभागास तातडीने द्यावी, असे निर्देश निवासी उपजिल्हादंडाधिकारी मच्छिंद्र सकटे यांनी दिल्या आहेत.
आरोग्य विभागाचे पत्र दिनांक 2 जुलै 2020 च्या पत्रानुसार सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक व खाजगी औषध विक्रेते यांना यापूर्वी लेखी सूचना देण्यात आलेल्या आहेत बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णाचे लवकर निदान व उपचार होण्यासाठी सर्व खाजगी वैद्यकीय व्यवसायिक व खाजगी औषध विक्रेते यांनी संशयित कोरोना 19 रुग्णांची तपासणी व उपचारांकरिता
आपल्याजवळील कोरोना केअर सेंटर,ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी संदर्भित करावी. तसेच त्याबाबत संबंधित तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधीक्षक यांना फोन किंवा एस एम एस व्हाट्सअप द्वारे कळविण्यात यावी अशा सूचना पुन्हा देण्यात येत आहे यामध्ये चूक निदर्शनास आल्यास कडक कार्यवाही करण्यात येईल,असे सूचित केले आहे.