आता 50 नव्हे तर 10च लोकांच्या उपस्थितीत करावा लागणार विवाह सोहळा
बीड
बीड जिल्ह्यात 31 जुलै मध्यरात्रीपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 लागू करण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार विवाह समारंभासाठी 50 लोकांच्या मर्यादेत परवानगी देण्यात आली होती सोशल डिस्टंसिंग चे पालन करून विवाह सोहळा पार पाडण्यात यावा असे आदेश देण्यात आले होते मात्र बीड जिल्ह्यात विषाणूची लागण मोठ्या प्रमाणावर होत असून दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत असल्यामुळे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विवाह समारंभ बाबत नवीन निर्देश देण्यात येत आहे विवाह सोहळ्यासाठी आता फक्त 10 लोकांच्या मर्यादेतच परवानगी देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत
सदरील ठिकाणी कोरोना विषयक सामाजिक अंतराचे पालन करण्याच्या अटीवर विवाह सोहळ्यास परवानगी असेल प्रत्येक विवाह सोहळ्याची माहिती लेखी स्वरूपात किमान तीन दिवस आधी आयोजकांनी संबंधित पोलिस स्टेशन ग्रामपंचायत नगरपरिषद नगरपंचायत यांना लेखी स्वरूपात देणे बंधनकारक राहील तसेच विवाह सोहळ्यात सर्व नियमांचे पालन होत आहे किंवा नाही याची जबाबदारी मुख्याधिकारी ग्रामसेवक यांची राहील त्यामुळे आता यापुढे 50 लोकांच्या उपस्थितीत नव्हे तर फक्त 10 लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पाडावा लागेल