बीड जिल्ह्यात 36 बाधितांवर उपचार सुरू
बीड
बीड जिल्ह्यात 153 पॉझिटिव्ह संख्या असली तरी आज केवळ 36 रूग्णांवर जिल्ह्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत 157 रुग्णांमध्ये 4 जणांचा मृत्यू झालेला आहे तर 113 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत,बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे स्वॅब तपासणी करून घेण्यात येते ही साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाची सगळी यंत्रणा काटेकोरपणे काम करत असून नागरिकांनी देखील नियम पाळून कोरोनाचा मुकाबला करावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर बी पवार यांनी केले आहे
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या सध्या 153 आहे यामध्ये 113 जण बरे होऊन घरी परतले आहेत जिल्ह्यातील विविध कोविड सेंटर मध्ये सध्या 36 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर अन्य जिल्ह्यात 6 जणांवर उपचार सुरू आहेत,जिल्हा रुग्णालयात 18,अंबाजोगाई येथे 12,जणांना दाखल करण्यात आले आहे,हे सर्व रुग्ण सौम्य लक्षणे असलेली आहेत,आतापर्यंत बीडमधून 54,माजलगाव 11,गेवराई 5,आष्टी 17,पाटोदा 17,शिरूर कासार 3,वडवणी 4,केज 9,परळी 11,धारूर 14,अंबाजोगाई 4,आणि बाहेर जिल्ह्यात निदान झालेले 4 असे 153 रूग्ण आहेत,ऍक्टिव्ह असलेले 36 रुग्ण देखील लवकरच बरे होतील असे सांगून बीड शहरात आरोग्य विभागाच्या वतीने मेगा सर्वे करण्यात येत असून यातून लक्षणे आढळलेल्या लोकांची स्वॅब तपासणी करण्यात येत आहे,मास्क वापरणे,सोशल डिस्टसिंग पाळणे,गर्दी टाळणे,आणि स्वछता राखणे खूप महत्वाचे असून यातूनच आपण कोरोनाची साखळी तोडू शकतो त्यामुळे नागरिकांनी नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन डॉ आर बी पवार यांनी केले आहे