बीड जिल्ह्यात मास्कसक्ती 500 रुपये होणार दंड- जिल्हाधिकारी राहुल रेखावार
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्याचे आदेश
बीड
बीड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरता सार्वजनिक स्थळी थुंकणे यावर बंदी, चेहऱ्यावर कायम वापरणे सोशल डिस्टंसिंग पाळणे गरजेचे असून या बाबीचे पालन सर्व नागरीकांनी करावे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर विरुद्ध दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहे
बीड जिल्ह्यात कोरोनाविषाणू चा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाच्या वतीने कडक नियम लागू केले आहेत मात्र काही नागरिक कुठलेही नियम पाळत नसल्याचे दिसून येत आहे आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी याबाबत संबंधित विभागांना आदेश दिले आहेत
सार्वजनिक स्थळे बाजार रुग्णालय कार्यालय आदी ठिकाणी थुंकल्यास 1000 रुपये दंड व दुसऱ्यांदा थुंकल्यास फौजदारी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क न वापरणे नाक तोंड सुरक्षितपणे पुर्ण झाकलेले नसणे अशा व्यक्तींना 500 रूपये दंड आकारण्यात येणार आहे दुकानदार फळभाजी विक्रेते जीवनावश्यक वस्तू विक्रेते व ग्राहक यांनी सोशल डिस्टंसिंग चे पालन न केल्यास प्रत्येक व्यक्तीला 200 रुपये दंड आकारण्यात येणार असून संबंधित दुकानदारावर 2000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे तसेच किराणा जीवनावश्यक वस्तू विक्रेत्याने आपल्या दुकानात दरपत्रक न लावल्यास 5 हजार रुपये दंड व फौजदारी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत सार्वजनिक ठिकाणी रस्ते बाजार रुग्णालय कार्यालय आदी ठिकाणी एखादी व्यक्ती 18 वर्षापेक्षा कमी 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीसोबत आढळून आल्यास संबंधितांना 1000 रुपये व फौजदारी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत एखादी व्यक्ती दुचाकीवरून वैयक्तिक वापरासाठी चा भाजीपाला किराणा घेऊन जात असेल तर त्यास 1000 रुपये दंड आकारण्याचे आदेश देण्यात आले आहे वरील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीचे कारवाई करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचारी यांनी आवश्यकतेनुसार फोटोग्राफी व्हिडिओ ग्राफी मोबाईल द्वारे करावी ही कारवाई करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये नगरपालिका ग्रामपंचायत संबंधित शासकीय विभाग प्रमुख यांना कारवाईचे आदेश देण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आदेशात म्हटले आहे