मास्क वापरा अन्यथा 200 रुपये दंड: बीडमध्ये 52 जणांवर कारवाई
बीड-कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मास्क वापरणे बंधनकारक असल्याचा आदेश दिल्यानंतर जे नागरिक मास्क वापरणार नाहीत त्यांना आता दोनशे रुपये जागेवर दंड भरावा लागणार आहे बीड शहरात काल शनिवारी 52 जणांवर ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ उत्कर्ष गुट्टे यांनी दिली आहे
बीड जिल्ह्यात आता कोरोनाचा शिरगाव चांगलाच होऊ लागला आहे तर बीड शहरातही अर्धशतकाच्या पुढे कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे बीड शहरात आणि जिल्ह्यात मास्क सक्ती करण्यात आली आहे तोंडाला मास्क न लावता बाहेर फिरणाऱ्या 52 लोकांवर बीड नगरपालिकेने कारवाई केली आहे संचार बंदीच्या काळातही अनेक लोक विनाकारण बाहेर फिरून नियमांचे उल्लंघन करत आहेत तोंडाला मास्क न वापरताच अनेक लोक बाहेर फिरताना दिसू लागले आहे यावर नगरपालिकेने आता कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे शनिवारी 52 लोकांवर कारवाई करून 10400 रुपये दंड वसूल केल्याची माहिती डॉ उत्कर्ष गुट्टे यांनी माध्यमांना दिली आहे