बीडमध्ये डोअर टू डोअर होणार सर्वे;आरोग्य पथकाची टीम सज्ज
बीड
बीडमध्ये आज पासून डोअर टू डोअर आरोग्य सर्वे ला सुरुवात होणार असून 22 हजार घरे असलेल्या एक लाख लोकांची यादी निश्चित करण्यात आली असून नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र पेठ बीड अंतर्गत 58 हजार 783 लोकसंख्या व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र मोमिनपुरा अंतर्गत 58 हजार 818 लोकसंख्या असलेल्या ठिकाणी हा सर्वे होणार असून यासाठी 200 जणांची टीम तयार करण्यात आली आहे सर्वेक्षणाचा अहवाल दररोज सादर करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर बी पवार यांनी दिले आहेत
एकिकडे बीड जिल्हा कोरोना मुक्तीकडे वाटचाल करत असतानाच दुसरीकडे कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांचे स्वॅब तपासणीला पाठवल्यानंतर त्यामध्ये काहीजण पॉझिटिव आढळून येऊ लागले आहेत त्यामुळे त्याचा प्रादुर्भाव इतर ठिकाणी होऊ नये म्हणून आज पासून आठ दिवसांकरता जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कडकडीत लॉक डाऊन जाहीर केला आहे या लॉक डाऊन च्या काळात बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांसहित बीड शहरातील विविध भागात डोअर टू डोअर जाऊन आरोग्य विभागाच्या वतीने पथकाच्या माध्यमातून सर्वे सुरू होत आहे त्यामुळे कोरोना चा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग लक्षात येईल आणि कोरोनाची लक्षणे आढळून आलेल्या किंवा संशयित असलेल्या लोकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे,प्रभाग निहाय आरोग्य पथकांची नियुक्ती करण्याचे काम तात्काळ सुरू झाले असून कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाल्याचे दिसून येत आहे,बीडमधून होत असलेल्या या सर्वे मुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होणार आहे,नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये,आरोग्य पथकास आपली माहिती देऊन सहकार्य करावे आणि कोरोनाला समूळ नष्ट करण्यासाठी प्रत्येकाने सतर्क राहावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर बी पवार यांनी केले आहे