खूशखबर! SBI मध्ये 445 पदांसाठी होणार भरती:कसा कराल अर्ज
नवी दिल्ली, 25 जून : बँकिंग क्षेत्रामध्ये काम करू इच्छिणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) स्पेशलिस्ट ऑफिसर कॅडेर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. SBI च्या ऑफिशिअल वेबसाइटवरून या पदासाठी अर्ज करता येईल. हा 13 जुलैपर्यंत करता येणार आहे. याकरता एसबीआयने नोटिफिकेशन देखील जारी केले आहे. हा अर्ज करण्यासाठी ओळखपत्र, वयाचा दाखला, शैक्षणिक कागदपत्र आणि अनुभव प्रमाणपत्र या दस्तावेजांची गरज लागेल. कागदपत्रांच्या व्हेरिफेकेशनशिवाय शॉर्टलिस्टिंग पूर्णपणे मान्य होणार नाही. जर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावण्यात आले तर त्यावेळी मुळ कागदपत्र देखील नेणे आवश्यक आहे.
23 जूनपासून रोजी स्पेशल कॅडेर ऑफिसर पदाअंतर्गत नोकरीसाठी अर्ज घेण्यास सुरूवात झाली आहे. याठिकाणी अर्ज करण्यासाठी 13 जुलै ही डेडलाइन असणार आहे. एकूण 445 पदांसाठी ही नोकरभरती होणारी आहे. एसबीआय ही देशातील सर्वात मोठी बँक असल्याने अनेकांसाठी ही सुवर्णसंधी आहे. sbi.co.in या लिंकवर क्लिक करून एसबीआयने विविध पदांसाठी जारी केलेल्या नोटिफिकेशन संदर्भात माहिती मिळवू शकता या नोकरभरतीची नोंदणी प्रक्रिया तेव्हा पूर्ण होईल जेव्हा उमेदवार ऑनलाइन पद्धतीने बँकेमध्ये फी भरेल. या भरतीकरता कोणतीही लेखी परिक्षा होणार नाही आहे.
कसा कराल अर्ज?
-sbi.co.in ही वेबसाइट सुरू करा
-रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करून तुम्हाला हव्या असणारी पदासाठी तुम्ही अर्ज करू शकाल
-नवीन पेज उघडल्यावर त्याठिकाणी तुम्हाला लॉगइन किंवा रजिस्ट्रेशन करावे लागेल
-त्याठिकाणी असणारा अर्ज भरून पेमेंट प्रक्रिया पूर्ण करा(संदर्भ- खाजगी वृत्तसेवा)