बीड जिल्हा रुग्णालय प्रशासनाची कौतुकास्पद कामगिरी:कोरोनाग्रस्तांच्या उपचाराबरोबरच 1700 प्रसूतीही केल्या,
देशाच्या अनेक भागांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचारासाठी बेड अपुरे पडत असल्याच्या बातम्या वाचायला मिळत असताना बीड जिल्हा रुग्णालयाने कोरोनाग्रस्तांवर उपचारासोबतच इतर रुग्णांवरही यशस्वीरित्या उपचार केले आहेत. जिल्हा रुग्णालयामध्ये कोरोनाग्रस्तांसाठी अत्याधुनिक सुविधांसह 300 बेडची सुविधा उपलब्ध करून दिली. या सुविधेसह रुग्णालयाने तीन महिन्यांच्या कालावधीत 1700 महिलांच्या यशस्वी प्रसूतीही केल्या आहेत. 400 रुग्णांना डायलिसिसही सुविधाही रुग्णालयाने उपलब्ध करून दिली आहे.
बीड जिल्हा रुग्णालयात कोव्हीड कक्ष स्थापन करण्यात आला. कोरोनाग्रस्तांवर उपचार करत असताना त्याचा रुग्णालयातील इतर आरोग्यसेवेवर परिणाम होऊ नये यासाठी रुग्णालय प्रशासनाने काळजी घेतली होती. इतर रुग्णावर उपचारांसाठी आदित्य वैद्यकीय महाविद्यालय, काकू नाना हॉस्पिटल, कृष्णा हॉस्पिटल यांचा आधार घेतला. इतर सर्व रुग्णाची व्यवस्था या तीन रुग्णालयांत करण्यात आली. त्याचा फायदा असा झाला कोरोनावर उपचार करणाऱ्या रुग्णांना सुविधा उपलब्ध करून देता आल्या, आणि त्याचा फटका इतर रुग्णांना बसला नाही