पुणेमहाराष्ट्र

महत्त्वाची बातमी, प्रशासनाने जारी केला नवा आदेश:मास्क न वापरल्यास 500 रुपये दंड

लोकांक्षा न्यूज पोर्टलच्या वृत्ताची पुणे प्रशासनाने घेतली दखल

पुणे, 25 जून : पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात येईपर्यंत प्रत्येक नागरिकाने मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आला आहे. जर मास्क न वापरल्यास कुणी आढळलं तर त्याला 500 रुपये दंड ठोठवण्यात येणार आहे.

अनलॉक 1 मध्ये अटी शिथिल करत सर्व बाजारपेठा सुरू करण्यात आल्या आहे. परंतु, गेल्या दोन आठवड्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे शहरात मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. घराबाहेर पडताना, सार्वजनिक ठिकाणी, सरकारी-खाजगी कार्यालयात मास्कचा वापर सक्तीचा असणार आहे. मास्क न वापरल्यास 500 रुपये दंड वसूल केला जाणार आहे. शुल्क भरण्यास टाळाटाळ केली तर कलम 188 नुसार कारवाई केली जाणार आहे, असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

याबाबत लोकांक्षा न्यूज पोर्टलवर दोन दिवसांपूर्वीच मास्क सक्ती चा नियम लागू करावा व 500 रुपये दंड ठेवावा याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मास्क सक्ती गरजेची आहे,पुणे प्रशासनाने हा नियम लागू केला आहे तो बीडमध्ये देखील लागू केल्यास कोरोनाचा मुकाबला करता येईल

कोरोनाचा कहर कसा थांबणार !कलेक्टर साहेब आता खरी गरज आहे कडक नियमांची
https://lokankshanews.innews/1676/
■■■■■■■■■■■■
मास्क सक्ती नियम मोडणाऱ्यांना 500 रुपये दंडाची शिक्षा ठेवाच

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *