देशनवी दिल्ली

करदात्यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा! 2018-19साठी ITR फाइल करण्याची डेडलाइन वाढवली

नवी दिल्ली, 25 जून : केंद्र सरकारने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2018-19 साठी इनकम टॅक्स रिटर्न (Income Tax Return ITR) फाईल करण्याची डेडलाइन वाढवली आहे. आता आयटीआर भरण्यासाठी आणखी एका महिन्याचा कालवधी मिळेल, म्हणजेच हे काम तुम्ही 31 जुलैपर्यंत पूर्ण करू शकता. त्याचप्रमाणे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची तारीख देखील वाढवण्यात आली आहे. आता 31 मार्च 2021 पर्यंत हे दोन महत्त्वाचे दस्तावेज लिंक करता येणार आहेत. कोरोना व्हायरस पँडेमिक (Coronavirus Pandemic) केंद्र सरकारने याआधी आर्थिक वर्ष 2019-20 साठी आयटीआरची अंतिम तारीख वाढवून 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत केली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (CBDT) ने एका अधिसूचनेच्या माध्यमातून 2019-20 आर्थिक वर्ष 2019-20 साठी आयटी अधिनियमाच्या अंतर्गत कपातीचा दावा करण्यासाठी विभिन्न गुंतवणुकीची डेडलाइन 31 जुलै, 2020 पर्यंत वाढवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *