खूशखबर! महावितरणमधील ७,००० जागा आठ दिवसांत भरणार-ऊर्जामंत्र्यांचे आदेश
मुंबई-महावितरणच्या प्रलंबित भरती प्रक्रियेतील ७,००० जागा येत्या आठ दिवसांत भरण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. यामुळे वर्षभर रखडलेली ही भरतीप्रक्रिया आता पूर्ण होणार असून निवड प्रक्रियेतील उमेदवारांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, “महावितरणने जुलै २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करून २,००० उपकेंद्र सहायक आणि ५,००० विद्युत सहाय्यकांची सरळसेवा भरती प्रक्रिया राबविली होती. या प्रलंबित भरती प्रक्रियेचा निकाल तात्काळ जाहीर करून ८ दिवसांत संबंधितांना रूजू करून कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.”