1 जुलैपासून बदलणार ATM मधून पैसे काढण्याचा नियम
लॉकडाऊनमुळे एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल होणार आहे. 1 जुलैपासून तुमच्या खिशावरील भार वाढू शकतो. एटीएममधून पैसे काढणे 1 तारखेपासून महाग होणार आहे. अर्थ मंत्रालयाने एटीएममधून पैसे काढण्याठी सर्व ट्रान्झॅक्शन शूल्क हटवण्यात आले होते. कोरोना काळात नागरिकांवर आर्थिक भार येऊ नये याकरता हा निर्णय घेण्यात आला होता. 3 महिन्यासाठी देण्यात आलेली ही सूट 30 जून 2020 रोजी संपत आहे.
कमीतकमी बँलन्ससंदर्भात हा नियम बदलणार
कोरोना काळात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अशी घोषणा केली होती की, तुमच्या खात्यामध्ये निश्चित कमीतकमी बॅलन्स ठेवणे अनिवार्य नसेल. एप्रिल ते जून या महिन्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. कमीतकमी शिल्लक नसल्यास दंड आकारण्यात येणार नव्हता. मात्र आता ही सूट 30 जून रोजी संपणार आहे