खरे कि खोटे ?सरकारने दिले Google आणि Appleला चिनी Apps बंद करण्याचे आदेश?
गेल्या काही दिवसांपासून असा दावा केला जात आहे की, मंत्रालयाच्या नॅशनल इनफॉर्मेटिक्स सेंटरने आदेश दिला की, सरकारने गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) आणि ऍपल अॅप स्टोअरवर काही चिनी मोबाइल अॅप्सवर बंदी घातली आहे. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पण यावर सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे. असा कोणताही आदेश देण्यात आला नसल्याचं सरकरकडून सांगण्यात आलं आहे.
सोशल मीडियावर सुरू आहे अफवा
सरकारने चिनी Apps बंद केले असल्या संदर्भात सोशल मीडियावर अफवा सुरू आहे. केंद्र सरकारने Google आणि ऍपलच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना तातडीने प्रभावीपणे त्यांच्या फोनमधील चिनी अॅप बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत असं या व्हायरल मेसेज मध्ये लिहिण्यात आलं आहे.
यात TikTok, VMate, Vigo Video, LiveMe, Bigo Live, Beauty Plus, CamScanner, Club Factory, Shein, Romwe आणि AppLock सारख्या अॅप्सचा समावेश आहे.