लग्नकार्यासाठी मंगल कार्यालय, लॉन, हॉलसाठी परवानगी-सरकारचा निर्णय
येत्या दोन दिवसात राज्य शासन लग्नासाठी मंगल कार्यालयं, लॉन, नॉन एसी हॉलला परवानगी देणार असल्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती
लग्नासाठी मंगल कार्यालयं, लॉन, नॉन एसी हॉलला परवानगी देणार,मात्र केवळ 50 लोकांनाच नियम व अटीवर ही परवानगी असणार आहे,सोशल डिस्टनसिंगचे नियम व सरकारच्या सूचना पाळाव्या लागतील दोन दिवसात याबाबत सरकार निर्णय घेणार असल्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना दिली आहे त्यामुळे धुमधडाक्यात नसले तर मंगल कार्यालयात थाटामाटात लग्न सोहळा करण्याची इच्छा पूर्ण होणार आहे तर 3 महिन्यापासून बंद असलेल्या या व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे