महाराष्ट्रमुंबई

प्रत्येक जिल्ह्यात तज्ज्ञ डॉक्टर्सचा टास्क फोर्स नेमा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : गेल्या तीन महिन्यांपासून आपण कोरोना संकटाचा सामना करत आहोत. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग आपण चांगल्या पद्धतीने रोखला असला तरी मृत्यू दर वाढणे बरोबर नाही. लॉकडाऊन शिथिल केल्याने काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्येत वाढ होत आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील लोकांना जलदरित्या शोधणे हा एकमेव मार्ग आहे. या कामांत अजिबात ढिलाई नको असे सांगतांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये तेथील तज्ज्ञ डॉक्टर्सचे टास्क फोर्स नेमावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगर पालिका आयुक्त यांच्याकडून कोरोना परिस्थितीचा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा मुख्यमंत्र्यांनी आज घेतला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील सहभागी झाले होते.
ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग केंद्राची नियमावली राबवावी
ट्रॅकिंग आणि ट्रेसिंगच्या बाबतीत केंद्राने आणि राज्याने व्यवस्थित मार्गदर्शिका दिल्या आहेत. त्याप्रमाणे योजना राबण्यात आल्या पाहिजे. काही ठिकाणी वरिष्ठ डॉक्टर्स हे आपले वय आणि इतर आजार असल्याने कोविड रुग्णांना तपासत नाहीत. कनिष्ट डॉक्टर्स कोविड जबाबदारी सांभाळत आहेत असे निदर्शनास आले आहे. या वरिष्ठ डॉक्टर्सनी थेट कोविड उपचार करायचे नसतील तर रुग्णालयांत उपस्थित राहून इतर डॉक्टर्सना मार्गदर्शन करू शकतात किंवा संगणक, स्मार्ट फोन कॅमेरा या माध्यमातून स्वत:ला सुरक्षित ठेवून उपचारांचे मार्गदर्शन करणे सहज शक्य असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *