महाराष्ट्रात पुन्हा एकदा युती सरकार स्थापन करायला हवं-स्वामी
मुंबई: महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील कुरबुरींच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी अत्यंत सूचक वक्तव्य केलं आहे. ‘काँग्रेस व राष्ट्रवादीनं ठाकरे सरकारचा पाठिंबा काढला तर भाजपनं देशहितासाठी पुढं येऊन या सरकारला पाठिंबा द्यावा,’ असं मत स्वामी यांनी व्यक्त केलं आहे.
याच पार्श्वभूमीवर सुब्रमण्यम स्वामी यांनी एक ट्विट केलं आहे. ‘काँग्रेस-राष्ट्रवादीनं महाराष्ट्रातील ठाकरे सरकारचा पाठिंबा काढल्यास देशहित लक्षात घेऊन भाजपनं या सरकारला पाठिंबा द्यायला हवा आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा युती सरकार स्थापन करायला हवं,’ असा सल्ला त्यांनी दिला आहे. स्वामी यांच्या या ट्विटमुळं भाजप अजूनही शिवसेनेशी युती करायला तयार असल्याचं समोर आलं आहे.
If Congi and NCP withdraw support from Uddhav government then in the national interest BJP must extend support and re-form NDA govt in Maharashtra37K