चायनीज अँपमुळे कोणता आहे धोका, जाणून घ्या
नवी दिल्लीः चिनी मोबाइल एप्लिकेशन बनवणाऱ्या कंपन्या या भारतात एक वाढत असलेले मार्केट आहे. TikTok पासून UC ब्राउझर पर्यंत आणि हेलो अँप पर्यंत हे सर्व चायनीज अँप्स भारतात खूप प्रसिद्ध आहेत. या अँपचा वापर इतका भयानक सिद्ध होऊ शकतो की, तुम्ही त्याचा विचार करु शकत नाही. काही रिपोर्ट्सच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे की, चायनीज app धोकादायक असतात. त्यांच्यामुळे काय नुकसान होऊ शकते, जाणून घ्या.
गरज नसलेले अक्सेस मागितले जाते
एका इनफॉर्मेशन सिक्योरिटी फर्मच्या स्टडीत म्हटले की, Helo, Shareit आणि UC ब्राउझर यासारख्या १० पैकी ६ प्रसिद्ध चायनीज एप्स युजर्संना कॅमेरा आणि मायक्रोफोनचा अँक्सेस मागतात. परंतु, या अँप्समध्ये या सारख्या अँक्सेसचे कोणतेही काम नसते. पुण्याच्या Arrka Consulting चे सह संस्थापक संदीप रावने म्हटले की, हे जगभरातील टॉप ५० अँप्सकडून मागितलेल्या परमिनशनपेक्षा ४५ टक्के जास्त आहे.
अधिक चायनीज अँप्स लोकेशनचा अँक्सेस मागते. rrka Consulting च्या सह संस्थापक शिवांगी नाडकर्णी यांच्या माहितीनुसार, यूसी ब्राऊझर लोकेशनचा अँक्सेस मागते. ही व्यक्ती कुठून माहिती सर्च करतेय, याची माहिती मिळवता यावी यासाठी हा कंपनीचा खटाटोप आहे. यासारखे अँक्सेस हा फूड डिलिव्हरी देणाऱ्या अँप्ससाठी गरजेचा आहे. यूसी ब्राऊझरला हे कशासाठी हवे आहे?
कोणता अँप पाठवतो डेटा
स्टडीमध्ये हेही उघड झाले आहे की, अँप्स युजर्संचा डेटा सात विदेशी एजन्सीला ट्रान्सफर करते. यात म्हटले की, ६९ टक्के यूएस ट्रान्सफर केला जातो. रिपोर्टनुसार, टिकटॉक आपला डेटा चायना टेलिकॉमला पाठवतो. तर विगो व्हिडिओ आपला डेटा Tencent, ब्यूटीप्लस आपला डेटा Meitu आणि QQ व UC ब्राउजरला डेटा आपली पॅंरंट कंपनी Alibaba पर्यंत पोहोचवतो.
हेरगिरीचाही आरोप
चायनीज अॅप्सवर हेरगिरी आणि धोका करीत असल्याचा आरोग करण्यात आलेले आहेत. २०१७ मध्ये भारतीय इंटेलिजन्स एजन्सी ने असा ४२ मोबाइल अँप्लिकेशन्सचा वापर न करण्याचा सल्ला दिला होता. जो चायनीज डेव्हलपर्सने तयार केलेला आहे. किंवा चीन संबंधी त्यात लिंक आहे. हा इशारा भारतीय लष्कर आणि अर्ध सैनिक दल यांच्यासाठी जारी केला होता. त्यावेळी म्हटले होते की, हे अँप्स सायबर अटॅक करण्याची क्षमता ठेवतात.
नुकतेच Upstream च्या एका रिपोर्टमध्ये प्रसिद्ध चायनीज अँप Snaptube वर युजर्संची फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे. यात म्हटले की, विना परमिशन युजर्संना प्रीमियम सर्विससाठी साइन अप करण्यात येते. तसेच जाहाराती डाऊनलोड आणि क्लिक सुद्धा केले जाते. रिपोर्टच्या माहितीनुसार गेल्या वर्षी ७ कोटीहून अधिक फ्रॉड ट्रान्झॅक्शन स्नॅपट्यूब कडून करण्यात आली आहे.