बीड

गणेशोत्सव साजरा करण्यासंबंधी राज्य सरकारची महत्त्वाची सूचना

गणेशोत्सव साजरा करण्यासंबंधी मोठा निर्णय

गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव असून अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. मात्र सध्या करोना विषाणूचे संकट अधिक गडद बनू लागल्याने यावर्षीचा गणेशोत्सव नेमका कसा साजरा होईल याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. सर्व गणेशभक्तांचं सरकारच्या निर्णयाकडे लक्ष लागलं होतं. दरम्यान करोनामुळे यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारकडून यासंबंधी सूचना देण्यात आली असून मंडळांनी निर्णय मान्य करणार असल्याचं सांगितलं आहे.
सार्वजनिक गणेश मंडळ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक झाली. उद्धव ठाकरे यांनी यावेळी करोनाचा संकट असल्याने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यासंबंधी सूचना दिल्या. गणेश मंडळांनीही यासाठी तयारी दर्शवली असून राज्य सरकार देईल तो आदेश आपण मान्य करणार असून कोणताही अडथळा आणला जाणार नाही असं आश्वासन दिलं.
दरम्यान सरकारचा निर्णय येण्याआधीच अनेक मोठ्या मंडळांनी गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच आगमन सोहळेही रद्द केले आहेत. मुंबईतील प्रसिद्ध चिंतामणी गणेश मंडळाने आगमन सोहळा रद्द केला असून मंडपातच गणेशमूर्ती घडवण्याचा निर्णय घेतला आहे.
मिरवणुकांना परवानगी नाही
एकूणच परिस्थिती लक्षात घेऊन गणेशोत्सव काळात ध्वनिक्षेपकाचा वापर, आगमन आणि विसर्जन मिरवणुकांना परवानगी देण्यात येणार नसल्याचे स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत आयोजित करण्यात येत असलेल्या बैठकांमध्ये स्पष्ट करण्यात येत आहे.
मूर्तिकारही अडचणीत
दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून १० फूट, १२ फूट व इतर मोठमोठय़ा गणेश मूर्ती घडविण्याचं काम हे कलाकार करीत असतात. रंगरंगोटी, हिरे सजावट व इतर सजावटीची कामे केली जातात. यातून या कलाकारांना चांगली कमाई होत असते. मात्र यंदाच्या वर्षी करोनाच्या संकटामुळे बहुतांश मंडळांनी मोठय़ा मूर्ती न ठेवता लहानच मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतल्याने या कलाकारांना मोठय़ा मूर्त्यां बनविण्यासाठीच्या ऑर्डर मिळणार नसल्याने याचा परिणाम मूर्ती घडविणाऱ्या कलाकारांवरही झाला आहे.

कोरोनाच्या काळात होनार्या गणेश उत्सवा च्या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख व महाराष्ट्रातील प्रमुख गणेश मंडळाच्या पदाधिकार्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून चर्चा करुन महत्वाच्या सुचना केल्या ..या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार , ग्रहमंञी अनिल देशमुख, खा. अनिल देसाई, प्रधान सचिव विकास खारगे, पोलीस महासंचालक, शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक, कुंडलिक खांडे , राष्ट्रीय गणेश मंडळाचे अध्यक्ष अम्रुत काका सारडा , धनंजय वाघमारे आदी उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *