महाराष्ट्रमुंबई

सूर्यग्रहण जून २०२०: ‘या’ आहेत महाराष्ट्रातील शहरनिहाय ग्रहणाच्या वेळा

सन २०२० मधील पहिले सूर्यग्रहण २१ जून २०२० रोजी लागणार आहे. देशाच्या काही भागातून ते खग्रास, तर काही भागातून कंकणाकृती प्रकारचे दिसेल. महाराष्ट्र राज्यातील मुंबईसह प्रमुख शहरात सूर्यग्रहण नेमके कधी दिसेल? या सूर्यग्रहणाच्या स्पर्श, मध्य व मोक्ष वेळा शहरनिहाय कोणत्या आहेत? जाणून घेऊया…

या सूर्यग्रहणात सूर्याचा ९९ टक्के भाग झाकला जाईल. वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केल्यास सूर्य आणि पृथ्वीच्या मधे चंद्र आला की, सूर्यग्रहण घडते. ग्रहणकाळात सूर्याचा संपूर्ण प्रकाश पृथ्वीवर पोहोचत नाही. जेव्हा सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे लपला जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. जेव्हा सूर्याचा काही भाग चंद्राच्या मागे जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात आणि जेव्हा चंद्र पृथ्वीपासून त्याच्या सर्वाधिक लांब अंतरावर राहून सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येऊन सूर्याच्या प्रकाशाला झाकून टाकतो तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण बघायला मिळते. सूर्यग्रहण पाहताना काळजी घेणे आवश्यक ठरते. पिनहोल कॅमेरा, टेलिस्कोप, सोलार एक्लिप्स गॉगल यांसारख्या गोष्टींचा वापर करणे हिताचे ठरते. महाराष्ट्र राज्यातील मुंबईसह प्रमुख शहरात सूर्यग्रहण नेमके कधी दिसेल? या सूर्यग्रहणाच्या स्पर्श, मध्य व मोक्ष वेळा शहरनिहाय कोणत्या आहेत? जाणून घेऊया…

शहरेस्पर्शमध्यमोक्ष
मुंबईसकाळी १० वाजतासकाळी ११ वाजून ३७ मिनिटेदुपारी १ वाजून २७ मिनिटे
ठाणेसकाळी १० वाजून ०१ मिनिटसकाळी ११ वाजून ३८ मिनिटेदुपारी १ वाजून २८ मिनिटे
पुणेसकाळी १० वाजून ०२ मिनिटेसकाळी ११ वाजून ४० मिनिटेदुपारी १ वाजून ३० मिनिटे
रत्नागिरीसकाळी १० वाजतासकाळी ११ वाजून ३६ मिनिटेदुपारी १ वाजून २५ मिनिटे
कोल्हापूरसकाळी १० वाजून ०२ मिनिटेसकाळी ११ वाजून ३९ मिनिटेदुपारी १ वाजून २८ मिनिटे
सातारासकाळी १० वाजून ०२ मिनिटेसकाळी ११ वाजून ३९ मिनिटेदुपारी १ वाजून २९ मिनिटे
नाशिकसकाळी १० वाजून ०३ मिनिटेसकाळी ११ वाजून ४२ मिनिटेदुपारी १ वाजून ३२ मिनिटे
अहमदनगरसकाळी १० वाजून ०५ मिनिटेसकाळी ११ वाजून ४४ मिनिटेदुपारी १ वाजून ३४ मिनिटे
धुळेसकाळी १० वाजून ०६ मिनिटेसकाळी ११ वाजून ४६ मिनिटेदुपारी १ वाजून ३७ मिनिटे
जळगावसकाळी १० वाजून ०८ मिनिटेसकाळी ११ वाजून ४९ मिनिटेदुपारी १ वाजून ३९ मिनिटे
वर्धासकाळी १० वाजून १६ मिनिटेसकाळी ११ वाजून ५९ मिनिटेदुपारी १ वाजून ४८ मिनिटे
यवतमाळसकाळी १० वाजून १४ मिनिटेसकाळी ११ वाजून ५७ मिनिटेदुपारी १ वाजून ४७ मिनिटे
बीडसकाळी १० वाजून ०७ मिनिटेसकाळी ११ वाजून ४७ मिनिटेदुपारी १ वाजून ३७ मिनिटे
सांगलीसकाळी १० वाजून ०३ मिनिटेसकाळी ११ वाजून ४० मिनिटेदुपारी १ वाजून ३० मिनिटे
सावंतवाडीसकाळी १० वाजून ०१ मिनिटसकाळी ११ वाजून ३७ मिनिटेदुपारी १ वाजून २५ मिनिटे
सोलापूरसकाळी १० वाजून ०७ मिनिटेसकाळी ११ वाजून ४६ मिनिटेदुपारी १ वाजून ३५ मिनिटे
नागपूरसकाळी १० वाजून १७ मिनिटेदुपारी १२ वाजून ०१ मिनिटदुपारी १ वाजून ५१ मिनिटे
अमरावतीसकाळी १० वाजून १३ मिनिटेसकाळी ११ वाजून ५६ मिनिटेदुपारी १ वाजून ४६ मिनिटे
अकोलासकाळी १० वाजून ११ मिनिटेसकाळी ११ वाजून ५३ मिनिटेदुपारी १ वाजून ४३ मिनिटे
औरंगाबादसकाळी १० वाजून ०७ मिनिटेसकाळी ११ वाजून ४७ मिनिटेदुपारी १ वाजून ३७ मिनिटे
भुसावळसकाळी १० वाजून ०८ मिनिटेसकाळी ११ वाजून ४९ मिनिटेदुपारी १ वाजून ४० मिनिटे
परभणीसकाळी १० वाजून १० मिनिटेसकाळी ११ वाजून ५१ मिनिटेदुपारी १ वाजून ४१ मिनिटे
नांदेडसकाळी १० वाजून १२ मिनिटेसकाळी ११ वाजून ५३ मिनिटेदुपारी १ वाजून ४३ मिनिटे
उस्मानाबादसकाळी १० वाजून ०८ मिनिटेसकाळी ११ वाजून ४७ मिनिटेदुपारी १ वाजून ३७ मिनिटे
भंडारासकाळी १० वाजून १९ मिनिटेदुपारी १२ वाजून ०३ मिनिटेदुपारी १ वाजून ५२ मिनिटे
चंद्रपूरसकाळी १० वाजून १७ मिनिटेदुपारी १२ वाजून ०१ मिनिटदुपारी १ वाजून ५० मिनिटे
बुलढाणासकाळी १० वाजून ०९ मिनिटेसकाळी ११ वाजून ५० मिनिटेदुपारी १ वाजून ४० मिनिटे
पणजीसकाळी १० वाजून ०१ मिनिटेसकाळी ११ वाजून ३६ मिनिटेदुपारी १ वाजून २४ मिनिटे
बेळगावसकाळी १० वाजून ०३ मिनिटेसकाळी ११ वाजून ३९ मिनिटेदुपारी १ वाजून २७ मिनिटे
इंदौरसकाळी १० वाजून १० मिनिटेसकाळी ११ वाजून ५१ मिनिटेदुपारी १ वाजून ४२ मिनिटे
ग्वाल्हेरसकाळी १० वाजून १९ मिनिटेदुपारी १२ वाजून ०२ मिनिटेदुपारी १ वाजून ५१ मिनिटे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *