भारतीय बाजारातून चिनी कंपन्या हद्दपार करणार, मोदी सरकारचा मोठा निर्णय
नवी दिल्ली, 17 जून : दूरसंचार मंत्रालयाने BSNL आणि MTNL सह सर्व खाजगी कंपन्यांना चीनसोबत झालेले करार रद्द करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर चिनी उपकरणांच्या वापरावरही निर्बंध घातले आहेत. यासह जुने करारही रद्द करण्यास सांगितले असून यापुढे यामधील कोणत्याही करारात चीन नसेल, असंही म्हटलं आहे. भारत-चीन तणावादरम्यान मोदी सरकारने हा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे
काय करणार बदल
–सरकारी 4G यंत्रणेत चिनी उपकरणांच्या वापरावर यापुढे बंदी
–चीनला भारतीय बाजारातून हद्दपार करण्याची मोहीम
–खासगी कंपन्यांना चिनी उपकरण वापर-खरेदीवर बंदीचे आदेश
–नव्या शर्थींसह सरकारी टेंडरमधून चिनी कंपन्यांना बाहेर ठेवणार
–इतर खाजगी मोबाइल कंपन्यांनाही चिनी उपकरण्याचा वापर कमी करण्यास सांगण्यात येणार आहे
दरम्यान लडाखमध्ये गलवान खोऱ्यात सुरू असलेल्या भारत-चीन सैन्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठा निर्णय घेतला आहे. 19 जून रोजी त्यांनी तणावाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीयांची बैठक बोलवली आहे. ही बैठक व्हिडीओ कॉन्फन्सिंगद्वारे शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. या बैैठकीमध्ये भारत आणि चीनमधील गलवान खोऱ्यात सुरू असलेल्या वादावर चर्चा करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. गलवानच्या खोऱ्यात सोमवारी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये मोठा वाद झाला या वादाचं रुपांतर हिंचारात झालं. यामध्ये भारताचे 23 जवान शहीद झाले असून 80 जण जखमी आहेत त्यापैकी 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. या हिंसाचारात चीनच्या सैनिकांचाही मृत्यू झाला आहे.