शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता;ऑगस्टपासून सहावा हप्ता
नवी दिल्ली: करोना व्हायरसमुळे आर्थिक संकटाचा सामना सर्वांना करावा लागत आहे. अशातच नरेंद्र मोदी सरकारने देशातील शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. पंतप्रधान किसान सम्मान निधी योजना अंतर्गत आतापर्यंत ९.८५ कोटी शेतकऱ्यांना फायदा झालाय. आता पुन्हा एकदा केंद्र सरकार शेतकऱ्यांना या योजने अंतर्गत १ ऑगस्ट रोजी सहावा हप्ता पाठवणार आहे.
मोदी सरकारकडून पाठवण्यात आलेल्या मेसेजमध्ये म्हटले आहे की, प्रिय शेतकरी आता तुम्ही तुमची विनंती अर्जाची स्थिती पीएम किसान हेल्पलाइन नंबर ०११-२४३००६०६ वर फोन करून माहित करून घेऊ शकता. यासाठी तुम्ही नोंदणी केलेल्या मोबाइल नंबरवरून जाणून घेऊ शकता.
पीएम किसान योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक अग्रवाल यांनी सांगितले की, ऑगस्टपासून सहावा हप्ता पाठवला जाईल. ही रक्कम २ हजार इतकी असेल. आतापर्यंत ९.५४ कोटी लोकांना याचा फायदा झाला आहे. या योजनेनुसार मोदी सरकार तीन टप्प्यात शेतकऱ्यांना ६ हजार रुपये देते.
टीप-बातमीत वापरलेले छायाचित्रे हे संग्रहित आहे