पंतप्रधान मोदी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोलणार
पंतप्रधान कार्यालयाकडून आज बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे. यात केवळ 6 मुख्यमंत्र्यांना बोलवण्यात आले आहे
नवी दिल्ली, 17 जून : कोरोना व्हायरसने देशभरात थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. जगात भारत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. आज पंतप्रधान मोदी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी चर्चा करणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर आज ज्या राज्यात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे, अशा राज्यांसोबत पंतप्रधान मोदी दुपारी 3 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करणार आहे. यात आज सर्वात पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार आहे.