बीड

जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह

अंबाजोगाई येथील कार्यक्रमात पालकमंत्री व सोबत असणाऱ्या काही कोरोना बाधिताच्या संपर्कात आल्याच्या कारणाने जिल्हाधिकारी व अन्य अधिकारी यांचे स्वॅब तपासणी साठी पाठवण्यात आले होते त्यात एसडीओ-अंबाजोगाई आणि डीन, मेडिकल कॉलेज, अंबाजोगाई यांचे स्वाब चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.अशी माहिती स्वतः जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी माध्यमांना दिली आहे
कोविड 19 या स्वॅब तपासणी केंद्राचे उदघाटन पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले होते त्यांनतर पालकमंत्री व त्यांचे स्वीय सहायक आणि अन्य 3 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले या कार्यक्रमात जिल्हाधिकारी व अन्य अधिकारी उपस्थित होते पॉजिटीव्ह अहवाल आल्यानंतर स्वतः जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक व अन्य अधिकारी यांनी स्वतःला कॉरटाईन करून घेतले आहे त्यांच्या स्वॅबचे नमुने तपासणी साठी पाठवण्यात आले होते ते अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्याची माहिती स्वतः जिल्हाधिकारी यांनी माध्यमांना दिली आहे त्यामुळे या सर्वांना दिलासा मिळाला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *