लवकरच Whatsapp युजर्सला कितीही जुने मेसेज शोधता येणार एका मिनिटात
मुंबई – सोशल मीडिया मधील सर्वात अधिक वापरलेजाणारे आणि अल्पवधीत लोकप्रिय झालेले अॅप म्हणजेच व्हॉट्सअॅप. मेसेज पाठवण्यासाठी सर्वाधिक वापरले जाणाऱ्या व्हॉट्सअॅपकडून सातत्याने नवनवीन अपडेट मिळत असतात.
आजच्या काळात संवाद साधण्याचं सर्वोत्तम माध्यम म्हणून या App कडे पाहिलं जातं. बऱ्याचदा आपल्याला जुन्या मेसेजचा संदर्भ हवा असतो तेव्हा तो मिळत नाही अशावेळी तो शोधणं अधिक कठीण होऊन जातं. यासाठी कंपनीकडून खास फिचर्स लाँच करण्यात येणार आहे. वेब इन्फोने दिलेल्या वृत्तानुसार या फिचरवर सध्या काम सुरू आहे. या फिचरचं टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर युझर्सला याचा लाभ घेता येणार आहे. आधी Apple आणि त्यानंतर Android फोनमध्ये उपलब्ध होणार आहे. एका कॅलेंडर आयकॉनला Whatsappसोबत जोडण्यात आलं आहे. त्यामुळे आपल्याला हे अॅप वापरताना कॅलेंडर आयकॉन दिसेल. या कॅलेंडरच्या मदतीनं तुम्ही कितीही जुने मेसेज एकदी एका मिनिटात शोधू शकणार आहात. तुम्हाला तारीख निवडायची आहे. त्या तारखेला तुम्ही कोणाशी आणि काय बोललात याचे तपशील पाहता येणार आहेत.