पेट्रोल-डिझेलची सलग पाच वेळा दरवाढ:महागाई पाय पसरू लागली
नवी दिल्ली: सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल महागले. दोन्ही इंधनांच्या दरांमध्ये गुरुवारी प्रत्येकी 60 पैशांची वाढ करण्यात आली. नव्या दरवाढीमुळे दिल्लीत लिटरमागे पेट्रोल 74 रुपये तर डिझेल 72 रुपये 22 पैशांवर पोहोचले.
सार्वजनिक इंधन कंपन्यांकडून करण्यात आलेली दरवाढ संपूर्ण देशासाठी लागू आहे. मात्र, स्थानिक विक्री कर किंवा मूल्यवर्धित करामुळे (व्हॅट) प्रत्येक राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगवेगळे आहेत. सार्वजनिक कंपन्यांनी 82 दिवसांच्या विश्रामानंतर रविवारपासून इंधनांच्या किमती दररोज निश्चित करण्याचे पाऊल उचलले.
तेव्हापासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. सलग पाच दरवाढींमुळे लिटरमागे पेट्रोल 2 रुपये 74 पैशांनी तर डिझेल 2 रुपये 83 पैशांनी महागले आहे.