कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी सरकारची नवीन मार्गदर्शक सूचना!
नवी दिल्ली: अनेक मंत्रालये आणि कार्यालयात कोरोना विषाणूची प्रकरणे समोर आल्यानंतर केंद्र सरकारने मंगळवारी आपल्या कार्यालयांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. एका दिवसात 20 पेक्षा जास्त कर्मचारी कार्यालयात नसावेत, असे सरकारने म्हटले आहे.
कार्मिक लोक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाने एक परिपत्रक काढले आहे, की केवळ त्याच कर्मचाऱ्यांनी कार्यालयात यावे ज्यांना कोरोना विषाणूशी संबंधित कोणतीही लक्षणे नाहीत. ज्या कर्मचाऱ्याला हलका ताप, घसा खवखवणे इत्यादी लक्षणे आहे, त्या सर्वांनी घरीच राहून काम करावे. कार्यालयात येऊ नये.
कंटेनमेंट झोनमध्ये राहणाऱ्या कर्मचार्यांना सरकारने घरून काम करण्यास सांगितले आहे. एका दिवसात 20 पेक्षा जास्त अधिकारी व कर्मचार्यांनी कार्यालयात हजर राहू नये, असे सरकारचे म्हणणे आहे. त्यानुसार विभागात ड्युटी चार्ट बनविण्यास सांगण्यात आले आहे.
मार्गदर्शक सूचनांनुसार एका केबिनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या दिवशी कार्यालयात यावे. शक्य असेल तर खिडक्या उघड्या ठेवा. ऑफिसमध्ये काम करताना मास्क किंवा फेस शील्ड घाला. असे न केल्यास कर्मचार्यावर कारवाई केली जाईल, असे मार्गदर्शकतत्वात नमूद केले आहे.