बीड शहरातील मसरतनगर येथे पूर्णवेळ संचारबंदी, कन्टेनमेंट झोन घोषित–जिल्हाधिकारी राहुल रेखावार
बीड,दि.9:- बीड शहरातील मसरत नगर येथे तीन व्यक्ती covid-19 पॉझिटिव आढळून आल्याने कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी अहवाल दिला असून कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळून आल्याने मसरथनगर परिसरातील हिना हॉटेल, जालना रोड ते जिशान मोहोम्मुद्दीन मोमीन यांच्या घरापर्यंत परिसर कंटेनमेंट म्हणून घोषित करण्यात आला आहे. वरील सर्व परिसर अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येऊन संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्य शासनाने लोक डाऊन चा कालावधी 30 जून 2020 पर्यंत वाढविला असल्याने या अनुषंगाने जिल्ह्यात दिनांक 30 जून 2020 रोजीचे रात्री 12 पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिता चे कलम 144 ,(1)(3) लागू करण्यात आले आहे. तसेच सदर आदेश या आदेशा सह अंमलात राहतील.