बाहेरून आलेल्या नागरिकांना आता सक्तीने होम कॉरंटाईनचा नियम –जिल्हाधिकारी राहुल रेखावर
विवाह समारंभ व अंत्यविधी साठी आता नवीन आदेश
बीड-शासनाने लग्नविधीसाठी ५० तर अंत्यविधीसाठी १० लोकांना परवानगी दिलेली आहे. मात्र अश्या कार्यक्रमासाठी बाहेर राज्यातून व जिल्ह्यातून आलेल्या नातेवाईकांनी थेट उपस्थित न राहता २८ दिवस कॉरंटाईन रहावे. अन्यथा त्या संबंधित लोकांवर व कार्यक्रमाच्या आयोजकांवर केलेल्या कुटुंबावर कडक कारवाई करण्याचा इशारा बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिला आहे.
सरकारच्या वतीने लग्न समारंभासरख्या कार्यक्रमाला ५० तर अंत्यविधीसाठी मयताच्या १० सख्या नातेवाईकां उपस्थित राहण्याची अनुमती दिली आहे. मात्र सदरील विधीसाठी कांही लोक बाहेर राज्यातून व जिल्ह्यातून येत असून कार्यक्रमात थेट सामील होत आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे.
त्यामुळे बाहेर राज्यातून व जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांनी कार्यक्रमात थेट सामील न होता २८ दिवस कॉरंटाईन राहणे बंधनकारक आहे. जेणे करून संसर्गाचा धोका कमी होईल. मात्र कांही लोक नियमांचे पालन करताना दिसून येत नाहीत. मात्र यापुढे असे निदर्शनास आले तर कार्यक्रमाचे आयोजक व कॉरंटाईन न होता थेट सामील झालेल्या नातेवाईकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहेत.