बीड जिल्ह्यातील रुग्ण संख्या 76 असली तरी 57 कोरोना मुक्त
बीड
बीड जिल्ह्यातील नागरिकांना घाबरून जाण्याचे कारण नाही बीड जिल्ह्यातील रुग्ण संख्या 76 असली तरी यापैकी 57 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून केवळ 17 रुग्णांवर उपचार सुरू आहेत जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत ते बाहेरगावचेच रहिवाशी आहेत त्यातील अनेक रुग्ण आज उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात येत आहेत
बीड जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला तो केवळ बाहेरगावच्या प्रवाशांमुळेच
सुरुवातीलाच पिंपळा तालुका आष्टी येथे 1 रुग्ण आढळून आल्यानंतर रुग्ण संख्या वाढण्याचा क्रम वाढू लागला यामध्ये ईटकुर तालुका गेवराई 2 हिवरा तालुका माजलगाव 1 सांगवी पाटण तालुका आष्टी कवडगाव थडी तालुका माजलगाव 2 चंदन सावरगाव तालुका केज 1 केळगाव तालुका केज 1 जय भवानी नगर बीड 3 मोमिनपुरा बीड 2 तालुका पाटोदा 3 पाटोदा शहरात 3 वडवणि शहरात 4 नित्रुड तालुका माजलगाव 7 सुर्डी तालुका माजलगाव 1 कुंडी तालुका धारूर 6 संभाजीनगर बीड शहर 1 धनगर वाडी तालुका आष्टी 1 साखरे बोरगाव तालुका बीड 3 दिलीप नगर बीड 2 हलम्ब तालुका परळी 2 बारगजवाडी तालुका शिरूर 2 कारेगाव तालुका पाटोदा 4 दुधिया गल्ली धारूर 1 बेलापुरी तालुका बीड 2 बालेपीर बीड 1 डोंगरी तालुका पाटोदा 1 सिरसदेवी तालुका 1 आंबे वडगाव तालुका दारू 4 भीम नगर परळी 1 झमझम कॉलनी बीड 1 मसरत नगर बीड 3 मालेगांव बुद्रुक तालुका गेवराई 1 मातावळी तालुका आष्टी 1 असे 76 रुग्ण आत्तापर्यंत आढळून आले असून यातील सांगवी पाटण तालुका आष्टी येथील 1 आणि मातावळी तालुका आष्टी येथील 1 हे दोन रुग्ण मृत्यू पावले आहेत आत्तापर्यंत 57 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून सध्या बीड जिल्ह्यात 17 रुग्णांवर उपचार सुरू आहेत यातील परळीच्या महिलेवर औरंगाबाद येथे तर झमझम कॉलनी बीड मधील रुग्णावर पुणे येथे उपचार सुरू आहेत मसरत नगर येथे आढळून आलेल्या तीन रुग्णांनी पुणे येथे उपचारासाठी जाण्याची विनंती केली आहे हे रुग्ण हैदराबाद येथून बीड शहरात एका लग्नासाठी आले असल्याचे सांगण्यात आले आहे
बीड जिल्ह्यातील परिस्थिती अजूनही आटोक्यात आहे मात्र नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन केले पाहिजे अन्यथा दिलेली मोकळीक ही कोरोनाला आमंत्रण देणारी ठरेल आणि कोरोनाचा कहर दिसू लागेल कामाशिवाय नागरिकांनी बाहेरच पडू नये व बाहेर पडताना आपण कुणाच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घेणे हीच एकमेव सूचना महत्वाची ठरणार आहे