बीड

अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र न बाळगल्यास तातडीने कारवाई होणार

अधिकारी कर्मचाऱ्यांना ओळखपत्र बंधनकारक

बीड
राज्यातील नागरिक हे आपल्या विविध कामाच्या निमित्ताने शासकीय कार्यालयात येत असतात त्यांच्या कामाचे संबंधी त्याठिकाणी असलेल्या अधिकारी-कर्मचारी यांचे नाव आणि पद त्यांना माहित होत नाही यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांचे नाव व पदनाम माहित होण्याकरता ओळख पडणे आवश्यक आहे शासनाच्या असे निदर्शनास आले आहे शासकीय कार्यालयात हजर असलेल्या संबंधित अधिकारी कर्मचारी हे दर्शनी भागावर आपले ओळखपत्र लावत नाहीत ओळखपत्रांबाबत एखाद्या नागरिकाने विचारणा केली असता शासकीय अधिकारी कर्मचारी आपले ओळखपत्र दाखवत नाहीत या सर्व बाबी लक्षात घेऊन सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी यांना एका आदेशाद्वारे सक्त कारवाईची नोटीस बजावण्यात आली असून कार्यालयात असताना प्रत्येकाने आपले ओळखपत्र दर्शनीय भागावर लावावे जेणेकरून नागरीकांची तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी सदरील सूचनांची अंमलबजावणी करण्यास कुचराई करणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ योग्य ती कारवाई करावी सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरून उपलब्ध करुन देण्यात आला असून त्याचा संकेतांक 20 140 50 81 22 55 85 80 असा आहे असे अप्पर मुख्य सचिव डॉ पी एस मीना यांनी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना व विभागीय आयुक्तांना कळवले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *