ग्रामीण भागात 61 हजार कुटुंबांना पोहोचला होमिओपॅथीचा डोज
दोन दिवसाने बीड शहरातही होणार वाटप सुरू
बीड
कोरोना पासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे होमिओपॅथीचे आर्सेनिक अल्बम हे औषध आज बीड मतदारसंघातील ग्रामीण भागात 61 हजार कुटुंबांना पोहोच करण्यात आले आहे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते कालच याचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप केले होते येत्या दोन दिवसाने बीड शहरातही याचे वाटप सुरू होणार असल्याचे काकू नाना प्रतिष्ठानच्यावतीने कळविण्यात आले आहे
संपूर्ण जगाला कोरोना महामारीने ग्रासून सोडले आहे त्यातच बीड जिल्ह्यातही याचा शिरकाव होऊ लागला आहे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी काकू नाना प्रतिष्ठान’च्या माध्यमातून व सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथी मेडिकल कॉलेजमध्ये आर्सेनिक अल्बम-30 हे औषध तयार केले बीड व मतदार संघातील पाच लाख नागरिकांना हे औषध मोफत वाटप करण्याचा संकल्प त्यांनी केला होता काल सायंकाळी पाच वाजता प्रातिनिधिक स्वरूपात या औषध वाटपाचा प्रारंभ करण्यात आला त्याच वेळी माजी मंत्री क्षीरसागर यांनी येत्या आठवडाभरात हे वाटप पूर्ण होईल असे सांगितले होते त्यानुसार आज मतदारसंघातील ग्रामीण भागात नेकनुर 5500, बहिरवाडी 1970 पिंपळनेर 4050, नाळवंडी 8500, चौसाळा 6995, पाली 6400, शिरूर 9630, राजुरी 5030, लिंबागणेश 6760,इतक्या कुटुंबांना हे वाटप करण्यात आले आहे दोन दिवसाने बीड शहरात नगरसेवक व प्रमुख कार्यकर्त्यांच्या माध्यमातून बीडकरांना देखील हे औषध मोफत वाटप करण्यात येणार असल्याचे काकू नाना प्रतिष्ठान च्या वतीने कळविण्यात आले आहे