परळीबीड

खदानीत बुडून तीन भावंडांचा मृत्यू परळी जवळ दाऊतपुर शिवारात घडली दुर्दैवी घटना


परळी
कपडे धुण्यासाठी औष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरात एका खदानी जवळ गेलेल्या तीन भावंडांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली असून दाऊतपुर शिवारात ही घटना घडली आहे
नांदेड शहरातील आकाशवाणी परिसरात असलेले हे कुटुंब काही कामानिमित्त दाऊतपुर शिवारात आले होते सोमवारी सुरेखा राजाराम दांडेकर 15 रेखा राजाराम दांडेकर 13 आणि रोहित नारायण दांडेकर आठ ही तीन मुले खदानी जवळ खेळत असताना रोहित नावाचा मुलगा पाण्यात बुडत असताना पाहून त्याची बहीण सुरेखा हिने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तिलाही पोहता येत नव्हते तेव्हा रेखानेही उडी मारून त्यांना वाचवण्याचा प्रयन्त केला मात्र दुर्दैवाने तिघांचाही मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *