जिल्हा परिषदेच्या 793 शिक्षकांचे वेतन लवकरच मिळणार -सीईओ अजित कुंभार
बीड
जिल्हा परिषदेच्या 1 मार्च 2014 ते 30 नोव्हेंबर 2015 या कालावधीत कार्यरत असलेल्या व संचमान्यता उशिरा मिळाल्यामुळे वेतन न मिळालेल्या 793 प्राथमिक शिक्षकांचे थकित वेतन उच्च न्यायालयात खंडपीठ औरंगाबाद यांच्या निर्णयानुसार थकित वेतन अदा करण्याची कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली आहे
जी प मधील 793 शिक्षकांचे थकित वेतन शासन निर्णय व न्यायालयाच्या निर्देशानुसार व नियमानुसार पडताळणी करण्यासाठी जिल्हा स्तरावर विशेष समिती गठीत करण्यात आली होती या समितीने तपासणी करून उच्च न्यायालयाचे निर्देश व उपलब्ध अभिलेखे आदींची तपासणी करून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्याकडे अहवाल सादर केला त्यानुसार तीन जून रोजी 793 शिक्षकांचे वेतन अदा करण्याबाबत मान्यता देण्यात आली आहे 793 शिक्षकांची यादी व मंजुर वेतन याची सविस्तर यादी तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी व गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे संबंधित 793 शिक्षकांनी यादीमधील स्वतःची निगडित असलेल्या बाबींची खात्री करून घ्यावी तसेच थकीत वेतनासाठी अंतिम गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून होणार असून दिनांक 11 जून पर्यंत कालावधी निश्चित केलेला आहे याबाबत संपूर्ण प्रक्रिया ही विहित मुदतीत शासन निर्णयाप्रमाणे न्यायालयाच्या निर्देशानुसार पारदर्शकपणे पार पाडणे बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सूचना दिल्या आहेत याबाबत गटशिक्षणाधिकारी स्तरावर अनियमितता तक्रार दिसून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार व शिक्षणाधिकारी अजय बहिर यांनी दिले आहेत