10वी, 12वी निकाल प्रक्रिया युद्धपातळीवर
पुणे – पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या 49 टक्के, तर बारावीच्या 84 टक्के तपासलेल्या उत्तरपत्रिका मॉडरेटरकडून जमा झालेल्या आहेत. या दोन्ही परीक्षांच्या निकालाची प्रक्रिया राबविण्यासाठी युद्ध पातळीवर कामकाज सुरू झाले आहे.
राज्यात 18 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत इयत्ता बारावीची, तर 3 ते 23 मार्च या कालावधीत इयत्ता दहावीची परीक्षा घेण्यात आलेली आहे. लॉकडाऊनमुळे उत्तरपत्रिका तपासणीचा वेग काही काळ मंदावला होता. त्यानंतर गेल्या महिन्यापासून त्याला वेग आलेला आहे. मंडळाचे अध्यक्ष तुकाराम सुपे, सहसचिव व प्रभारी सचिव प्रिया शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जलद गतीने कामाला सुरुवात केली आहे. तपासलेल्या उत्तरपत्रिकांची 1,500 पोती जमा झाली आहेत. उत्तरपत्रिका स्कॅनिंगचे कामकाजही सुरू करण्यात आलेले आहे.
पुणे परीक्षा मंडळ विभागाची माहिती समाविष्ट जिल्हे :
पुणे, नगर, सोलापूर
परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी
बारावी: 2,53,747
दहावी: 2,85,642
मॉडरेटरकडून उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी तालुकानिहाय विशेष 12 संकलन केंद्र
इयत्ता दहावीसाठी 1,735 मॉडरेटर नियुक्त. 1,373 जणांकडील उत्तरपत्रिका व गुणतक्ते जमा. 24,57,601 पैकी 12,04,515 उत्तरपत्रिका जमा
इयत्ता बारावीसाठी 1,251 मॉडरेटर नियुक्त. 1 हजार जणांकडून उत्तरपत्रिका जमा. 13,90,083 पैकी 11, 69,44 उत्तरपत्रि