देशनवी दिल्ली

देशवासियांसाठी चांगली बातमी:कोरोना लस लवकरच विकसित होणार

कोरोना व्हायरसचा नायनाट करणारी लस शेवटी कधी येईल? आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे.

नवी दिल्ली, 6 जून: देशात आजकाल प्रत्येकाच्या मुखी एकच प्रश्न आहे. तो म्हणजे, कोरोना व्हायरसचा नायनाट करणारी लस शेवटी कधी येईल? आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे.

देशवासियांसाठी एक चांगली बातमी आहे. लस संदर्भात सुरू असलेल्या चाचण्यांमध्ये भारतातील उत्पादनासाठी तयारी सुरू झाली आहे. पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) प्रयोगशाळा कोरोना विषाणूची लस तयार करुन पुरवण्याची तयारी करत आहे
ब्रिटीश-स्वीडिश फार्मा कंपनी ‘एस्ट्राजेनेका’ने जाहीर केले आहे की, त्यांनी ‘ADZ1222’ ही लस पुरवण्यासाठी भारताशी करार केला आहे. एसआयआयबरोबर परवाना करार करणार आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाने कोरोनाच्या संभाव्य लस ‘एस्ट्राजेनेका’ कंपनीत पुरवण्याची जबाबदारी दिली आहे.
‘एस्ट्राजेनेका’ आणि ‘एसआयआय’ एकत्र मिळून एक अब्ज म्हणजे 100 कोटी लस तयार करण्याची तयारी करीत आहे. यातील 40 कोटी लस या वर्षाच्या अखेरीस पुरवण्याचे लक्ष्य आहे. पुण्यात उत्पादित कोरोना विषाणूची लस भारतासह कमी उत्पन्न असलेल्या देशांना पुरवली जाणार आहे.
कोरोना लस बनविण्याच्या शर्यतीत ऑक्सफोर्ड विद्यापीठ सर्वात आघाडीवर आहे. येथे लसीची चाचणी दुसर्‍या टप्प्यात पोहोचली आहे. नुकताच ऑक्सफोर्ड विद्यापीठाने लसीची फेज 2 आणि फेज 3 चाचणी जाहीर केली आहे. ज्यामध्ये दहा हजार प्रौढ सहभागी होणार आहे.
एसआयआयच्या प्रयोगशाळेमध्ये सध्या 165 देशांसाठी 20 प्रकारच्या लस तयार केल्या जातात. दरवर्षी लाखो लस येथून पुरवल्या जातात. परंतु यावेळी सीईओ अदार पूनावाला या कंपनीला देण्यात आलेल्या जबाबदारीबद्दल खूप उत्सुक आहेत.
गेल्या 50 वर्षांत एसआयआयने जागतिक स्तरावर लसीचे उत्पादन आणि पुरवठा करण्यात मोठी भूमिका बजावली आहे. एसआयआय सध्या यूकेच्या ऑक्सफोर्ड, अमेरिकेचे कोडजेनिक्स आणि ऑस्ट्रेलियाचे बायोटेक फार्म थेमिस यांनी विकसित केलेल्या लसीवर काम करत आहे. पण पूनवालाला यांना ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या लसीकडून सर्वाधिक अपेक्षा आहेत कारण यामध्ये या चाचणी सर्वात पुढे आहे. याव्यतिरिक्त, एसआयआय देखील स्वतःची लस विकसित करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *