आष्टीबीड

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींना मुदतवाढ द्या- प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांची मागणी


बीड
राज्य कोरोना सारख्या महामारी ला सामोरे जात असताना राज्यातील सरपंचांनी प्रचंड अशा प्रकारचे कष्ट घेतले आहेत एप्रिल मे जून मध्ये राज्यातील 1566 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणे अपेक्षित होते मात्र कोरोनामुळे या निवडणुका पुढे ढकलून त्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे पुढील टप्प्यात होणाऱ्या 12668 ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही शासनाने अनिश्चित काळासाठी पुढे ढकलत असल्याचे जाहीर केले आहे ग्रामविकास मंत्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सरपंच परिषदेच्या माध्यमातून आम्ही विनंती करत आहोत की राज्यामध्ये सध्या कोरोना सारखी महामारी सुरू आहे त्यामुळे शासनाने विशेषाधिकार वापरून या ग्रामपंचायतीला मुदतवाढ द्यावी सरकारने नोकरदारांच्या बदल्या एक वर्षासाठी कायदा असतानाही पुढे ढकलल्या आहेत सहकारी संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त झाल्यानंतर त्यांना दहा वर्ष बँकेची निवडणूक लढवता येत नाही असा कायदा आहे मात्र त्यातही नुकताच सोयिस्कर असा कायदा शासनाने केला आहे एवढ्या मोठ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमत उचित व्यक्तीची निवड केली जाईल असे ग्रामविकास मंत्री यांनी म्हटले आहे ही उचित व्यक्ती कोण असा प्रश्न निर्माण होतो विस्तार अधिकार्‍यांकडे किंवा तालुका लेवलवर काम करणारे विस्ताराधिकारी मंडळ अधिकारी यांना जर प्रशासक म्हणून नेमले तर यांची संख्या तालुक्यात नगण्य आहे एका पंचायत समितीत तीन ते चार विस्तार अधिकारी असतात आणि त्यांच्याकडे तालुक्यातील पन्नास-साठ ग्रामपंचायतीचा कारभार देऊन आपण मोठ्या प्रमाणावर आपत्ती ओढवून घेणार आहोत सरपंच हे आपत्कालिन व्यवस्थापन समितीचे गावपातळीवर अध्यक्ष आहेत त्यांचे सरपंच पद गेल्यावर त्यांचे अध्यक्षपदही जाणार आहे त्यामुळे गावात चांगल्या प्रकारचे काम केलेल्या सरपंचांना न्याय मिळणार नाही त्याच प्रमाणे कोरोनात काम करत असताना अनेक सरपंचांनी अनेकांचा विरोध ही पत्करला आहे कठोर भूमिका घेऊन कोरोना सारख्या महामारी ला आळा घातला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील मसुलीच्या सरपंच कोरण टाईन केलेला लोकांना भेटायला गेल्या असता त्यांचा अपघात होऊन त्यांच्या मांडीचे हाड फॅक्चर झाले शासनाने एक रुपयाची मदत दिली नाही उलट सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र ने त्यांना आर्थिक मदत केली आम्ही राज्यातील तमाम सरपंच यांच्यावतीने शासनाला नम्र विनंती करत आहोत की जोपर्यंत कोरोनाची महामारी आहे तोपर्यंत ग्रामपंचायतीला मुदतवाढ देण्यात यावी गेल्या दोन वर्षापासून ग्रामपंचायती अडचणीत आहेत त्यांना निधी खर्च करता आला नाही सुरुवातीला दुष्काळ त्यानंतर अनेक जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी आणि आता कोरोना सारखी महामारीचे संकट यामुळे ग्रामपंचायत चा निधी अखर्चित राहिला आहे तो निधी गावच्या विकासासाठी खर्च करण्यात यावा अशा प्रकारची मागणी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र च्या पदाधिकारी आणि सर्व सरपंचाची असून मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींना तात्काळ मुदतवाढ द्यावी अशा प्रकारची मागणी राज्य सरपंच परिषदेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी केली यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *