बीड

बीड जिल्ह्यात दोन खुनाच्या घटना


बीड
मुलीच्या घरी गेलेल्या एका 40 वर्षीय महिलेचा मांडव खेल शिवारात खून झाल्याची घटना उघडकीस आली असून अंबाजोगाई तालुक्यातील खापरटोन येथे एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे सदरील तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे बीड जिल्ह्यात या दोन खुनाच्या घटना घडल्याने खळबळ उडाली आहे

बीड येथील रहिवासी असलेली महिला मुलीच्या घरी मांडवखेल येथे आली होती या 40 वर्षीय महिलेचा खून करून प्रेत पुरले आणि हरवल्याची तक्रार करण्यात आली या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून सदरील महिलेचे प्रेत बाहेर काढण्यासाठी बीडचे तहसीलदार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कबाडे, उपाधीक्षक सावंत, एपीआय केंद्रे घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत तर अंबाजोगाई तालुक्यातील खापरटोन येथील ज्ञानोबा सोपान मुसळे या 38 वर्षीय तरुणाचा शाळेच्या टाकीजवळ मृतदेह आढळून आला याप्रकरणी बरदापुर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अंबाजोगाई येथील रुग्णालयात सदरील मृतदेह पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले हा खून नेमका कोणत्या कारणास्तव झाला हे मात्र स्पष्ट झाले नाही आज बीड जिल्ह्यात दोन खुनाच्या घटना घडल्या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *