पुणे

कोरोना व्हायरसपासुन बचाव करायचा, तर ही बातमी नक्की वाचा

पुणे – कोरोना विषाणूमुळे जगभरात दहशत पसरली आहे. भारतातही संक्रमित लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या धोकादायक साथीची लागण टाळण्यासाठी अनेक गाईड लाइन देखील जारी केल्या आहेत. लोकांना वेळोवेळी हात स्वच्छ करण्यास सांगितले गेले आहे.
दरम्यान, या विषाणूचा धोका टाळण्यासाठी असेच काही सोपे उपाय आज आम्ही सांगणार आहोत. जर तुम्ही हे उपाय अमलात आणले तर तुम्हाला याचा फायदा नक्की होईल. 25 degree C – 26 degree C पेक्षा जास्त तापमानात कोरोना व्हायरस जिवंत राहत नाही.

कोरोना व्हायरसच्या लागणाची लक्षणे

सर्दि, खोकल्या पासून सुरूवात
डोकेदुखी
ताप
घशात खवखवणे
शिंका येणे, नाकातून पाणी येणे
अशक्तपणा, थकवा
श्वास घेण्यास त्रास होणे/अडचण होणे
निमोनिया
फुफ्फुसांवर सुज
कोरोना व्हायरस पासून बचाव करण्यासाठी हे करा :
शारीरिक व भोवतालच्या परिसराची स्वच्छता ठेवा.
जेवणापूर्वी हात साबण लावून स्वच्छ धुवा.
शिंकताना व खोकलताना रूमाल वापरा.
सर्दी, तापाची लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांना भेटा.
सर्दी, खोकला व तापाच्या रूग्णांपासून लांब रहा.
प्राण्यांशी तहजेत संपर्क साधा.
समुद्री खाद्यापासून दूर रहा.
मांस व अंडी चांगले शिजवून खा.
जंगली प्राण्यांपासून लांब रहा.
हळद, हिंग, ओवा, धुप, कापुर यांचा वापर करावा. धुपनाने हवा शुद्ध होईल.
हवा शुद्ध ठेवण्यासाठी दिवसातुन दोन वेळा घरात धुपन करावे.
वरील प्रमाणे उपाय योजना केल्यास नक्की फायदा होईल. आपण दोन हात करून नक्कीच कोरोना पासून जिंकणार आहोत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *