पीक विम्यापासून वंचित शेतकऱ्यांसाठी संधी:12 जून शेवटची तारीख
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरिप हंगाम 2018ची
अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही अशा शेतकर्यांनी अपुर्ण कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन
बीड, दि. ४:-जिल्हयातील खरीप हंगाम 2018 मधील एकुण 13849 शेतकर्यांचे कागदपत्रे अपुर्ण असल्यामुळे पिक विम्यापासुन वंचित असल्याचे विमा कंपनीने कळविले असून 31 जुलै 2018 पुर्वी जमीन नावावर असल्याबाबतचा पुरावा किंवा फेरफार उतारा दिनांक 12 जुन 2020 पर्यंत संबंधित कृषि सहाय्यक यांचेकडे जमा करावा असे आवाहन राजेंद्र निकम, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, बीड यांनी केले आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरिप हंगाम 2018 मध्ये बीड जिल्ह्यात दि. ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लि. पुणे यांचे मार्फत राबविण्यात आली होती. सदर वंचित शेतक-यांची तालुकानिहाय संख्या अशी आहे. बीड 1414, पाटोदा 134, आष्टी 2121, शिरुर 734, माजलगाव 880, गेवराई 1804, धारुर 1492, वडवणी 232, अंबाजोगाई 1909, केज 115 व परळी 3014. तरी पिक विमा पासुन वंचित असलेल्या शेतक-यांची यादी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तालुका कृषी कार्यालयामार्फत कृषी सहाय्यकाकडे गाव निहाय यादया उपलब्ध करुन देण्यात आल्या असुन अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही अशा शेतक-यांनी यादी मध्ये दर्शविलेल्या गटाचा 31 जुलै 2018 पुर्वी जमीन नावावर असल्याबाबतचा पुरावा किंवा फेरफार उतारा दिनांक 12 जुन 2020 पर्यंत संबंधित कृषि सहाय्यक यांचेकडे जमा करावा. या तारखे नंतर सादर केलेला कागदपत्रांचा विचार केला जाणार नाही व सदरील शेतक-यांचे दावे रद्द समजण्यात येईल याची शेतक-यांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.