बारकुल हॉस्पिटलच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबीर… ६० दात्यांनी रक्तदान केले
बीड–दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी बारकुल हॉस्पिटलची वर्धापन दिनी रक्तदान शिबीराची परंपरा क़ायम ठेवत ११वा वर्धापन दिन साजरा केला. यावर्षी कोरोनाच्या साथीमुळे रक्तदात्यांची कमतरता जाणवत असताना मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांचा आवाहनास प्रतिसाद देत सलग अकराव्या वर्षी रक्तदाब शिबीर आयोजित करण्यात आले होते.या आवाहनास प्रतिसाद देत ६० जणांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले. सामाजिक बांधीलकीची जाणीव ठेवून जिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने हे रक्तदान शिबीर बारकुल हाॅस्पिटलच्या वतीने श्री.किशोर कु-हाडे यांनी आयोजित केले होते. या प्रसंगी डाॅ.अनिल बारकुल व डाॅ. सुनिता बारकुल यांच्यासह साठ जणांनी रक्तदान करुन या सामाजिक कार्यातील सहभाग उचलला. या शिबीरासाठी श्री.जगन्नाथ घुमरे, रमेश घुबडे, गोरख आवारे, निलेश नाईकनवरे, शामल पवार, नारायण फरताडे यांनी परिश्रम घेतले. तसेच जिल्हा रुग्णालय बीड येथील रक्तपेढीचे डाॅ.रेश्मा गवते , तंत्रज्ञ श्री. खेडकर, दिलीप औसरमल व पी.आर.ओ.श्रीमती कोकणे यांनी मोलाचे सहकार्य केले.