भारतीय औषध पद्धती- होमिओपॅथी औषधसूची आयोगास मंजुरी
नवी दिल्ली – भारतीय औषध पद्धती आणि होमिओपॅथी औषधसूची आयोगाची (झउखचक) पुनर्स्थापना करण्यास, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेतील केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. हा आयोग आता, आयुष मंत्रालयांतर्गत दुय्यम कार्यालय म्हणून काम करणार असून त्यासाठी आज, 1975 पासून गाझियाबादमध्ये कार्यरत असणाऱ्या “पीसीआयएम ऍन्ड एच’ अर्थात भारतीय औषध पद्धती, औषधसूची प्रयोगशाळा आणि “एचपीएल’ अर्थात होमिओपॅथिक औषधसूची प्रयोगशाळा या दोन केंद्रीय प्रयोगशाळांचे त्यात विलीनीकरण करण्यात आले.
सध्या “पीसीआयएम ऍन्ड एच’ ही आयुष मंत्रालयांतर्गत काम करणारी स्वायत्त संस्था आहे. तीनही संस्थांच्या संबंधित पायाभूत सुविधा, तांत्रिक मनुष्यबळ आणि आर्थिक संसाधने यांच्या व्यवहार्य आणि उचित उपयोजनाच्या उद्देशाने हे विलीनीकरण करण्यात आले आहे.
आयुर्वेद, सिद्ध, युनानी आणि होमिओपॅथिक औषधांच्या परिणामांविषयी प्रमाणीकरण करून प्रभावी पद्धतीने त्यांचे नियमन व गुणवत्तेवर नियंत्रण असा उद्देश यामागे ठेवण्यात आला आहे. आयुष प्रकारच्या औषधांचे प्रमाणीकरण विकसित होण्यास, तसेच औषधसूची व सूत्रे प्रकाशित करण्यास याचा उपयोग होऊ शकणार आहे. विलीनीकरणानंतरच्या “पीसीआयएम ऍन्ड एच’ च्या रचनेला कायदेशीर दर्जा देण्याचाही उद्देश येथे ठेवण्यात आला आहे.