संशयित म्हणून स्वॅब घेतले मात्र मृत्यूचे कारण दुसरेच
बीड : (प्रतिनिधी) ह्रदयाचा आणि लिव्हरचा आजार असलेला एका स्नेहनगर येथील व्यक्तीला कालच मंगळवारी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याचे स्वॅबही घेण्यात आले होते मात्र इतर आजार असल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे
मंगळवारी रात्री या रुगणाचा स्वॅब घेतला होता मात्र अचानक हृदयविकाराने किंवा अन्य कारणाने त्याचा मृत्यू झाला आहे असे जिल्हा रुग्णालयातुन सांगण्यात आले स्वॅब घेतले म्हणजे तो कोरोना रुग्णच असा समज करून घेऊ नये केवळ संभाव्य लक्षणे दिसल्यासच स्वॅब घेतले जातात
बीड शहरातील स्नेहनगर भागातील एक ४६ वर्षीय व्यक्तीला विविध आजार होते मंगळवारी सकाळी तो व्यक्ती जिल्हा रुग्णलयायात दाखल करण्यात आले केवळ लक्षणे दिसली म्हणून संशयित म्हणून त्याला आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. रात्री त्याचा स्वॅबही घेतला.मात्र त्याचा मृत्यू झाला. या रुग्णाला लिव्हर व ह्रदयाचा त्रास असल्याचे सांगण्यात येत आहे.