भाजपचे माजी आ. आर .टी. देशमुख यांचा अपघातात मृत्यू; बीड जिल्ह्यात हळहळ
बीड जिल्ह्यातील माजलगावचे माजी आमदार आर टी देशमुख यांच्या गाडीला लातूर तुळजापूर रस्त्यावरील बेलकुंड येथे अपघात झाला आहे. या अपघातात माजी आमदार आर.टी.देशमुख हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
तुळजापूर-औसा महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला आहे, या अपघातामध्ये भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचं निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आर. टी. देशमुख हे माजलगावचे माजी आमदार होते.
समोर आलेल्या माहितीनुसार महामार्गावरील बेलकुंड उड्डाण पुलावरून जात असताना त्यांची कार रस्त्यात साचलेल्या पाण्यामुळे स्लिप झाली, कार स्लिप झाल्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला. कार सुरक्षा कठडा तोडून चार वेळेस पलटी झाली, या अपघातामध्ये आर.टी. देशमुख हे गंभीर जखमी झाले हेते, त्यांना लातूर येथील रुग्णालयात उपचारासाठी नेत असतानाच वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान मिळत असलेल्या माहितीनुसार तुळजापूर-औसा महामार्गावर हा अपघात झाला आहे. पावसाच्या पाण्यामुळे बेलकुंड उड्डाण पुलावर कार स्लिप झाली, अनियंत्रीत झालेली कार सुरक्षा कठडा तोडून चारवेळेस पलटी झाली, या भीषण अपघातामध्ये देशमुख गंभीर जखमी झाले हेते, त्यांना उपचारासाठी लातूरला नेत असताना वाटेच त्यांचा मृत्यू झला आहे. आर. टी. देशमुख यांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
आर. टी. देशमुख हे भाजपचे माजी आमदार आहेत. ते 13 व्या विधानसभेत माजलगाव विधानसभा मतदारसंघातून प्रचंड बहुमतानं विजयी झाले होते. त्यांच्या राजकारणावर गोपीनाथ मुंडे यांचा प्रभाव होता, भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती, त्यांनी पक्षांतर्गत अनेक महत्त्वाच्या पदावर काम केलं. मनमिळावू , प्रेमळ आणि सर्वांना सहकार्य करणारा असा त्यांचा स्वभाव होता