पाकिस्तानकडून शस्त्रसंधीच उल्लंघन;चोख प्रत्युत्तर देण्याचे भारतीय सैन्याला आदेश
चार तासांपूर्वीच युद्धविरामाची घोषणा करण्यात आली होती, चार तासांच्या आतच पाकिस्तानकडून युद्धविराम तोडण्यात आला आहे, पाकिस्तानकडून राजौरी आणि बारामुल्ला परिसरात गोळीबार करण्यात आला, तसेच जम्मूमध्ये पुन्हा एकदा ड्रोन दिसून आल्यामुळे पूर्ण बॅकआउट करण्यात आलं आहे. पाकिस्तानच्या या नापाक हरकतींना भारतानं देखील चोख प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आता तणाव आणखी वाढण्याची चिन्ह आहेत. श्रीनगरमध्ये देखील स्फोटाचे आवाज आले आहेत.
चार तासांपूर्वीच दोन्ही देशांकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली होती. त्यासाठी अमेरिकेनं मध्यस्थी केली होती. आज पाच वाजल्यापासून युद्धविराम झाल्याची घोषणा करण्यात आली होती. परराष्ट्र सचिवांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. आज दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी पाकिस्तानच्या डीजीएमओचा भारताच्या डीजीएमओला फोन आला होता, त्यानंतर युद्धविरामाची घोषणा झाली, मात्र त्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत युद्धविराम तोडला आहे.
पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. राजौरी आणि बारामुल्ला परिसरात गोळीबार करण्यात आला, श्रीनगरमध्ये देखील स्फोटाचे आवाज ऐकू आले आहेत, तसेच जम्मूमध्ये पुन्हा एकदा ड्रोन दिसले असल्याची माहिती समोर आली आहे, जम्मूसोबतच राजस्थानमध्ये देखील दोन ठिकाणी ड्रोन दिसल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तानच्या या कारवाईला चोख प्रत्युत्तर देण्याचे आदेश गृहमंत्रालयाकडून आता भारतीय सैन्याला देण्यात आले आहेत. युद्धविरामाच्या अवघ्या काही तासांमध्येच पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. अनेक ठिकाणी स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत.