बारावी आणि दहावीच्या निकालाची तारीख ठरली;लवकरच घोषणा
राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. बारावी आणि दहावीच्या निकालाची तारीख ठरली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
१३ मे रोजी इयत्ता बारावीचा निकाल जाहीर होणार असून, दहावीचा निकाल १५ किंवा १६ मे रोजी जाहीर होईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
सकाळ वेबसाईटनुसार, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका वेळेत तपासून पूर्ण झाल्या आहेत. आता निकाल छपाई सुरू असून, लवकरच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहे, असं बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं.
बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परिक्षा ११ फेब्रुवारी ते ११ मार्च तर, दहावीच्या विद्यार्थ्यांची परिक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत पार पडली. सर्व शिक्षकांनी बोर्डाने दिलेल्या वेळेत उत्तपत्रिकांची तपासणी केली. आता निकाल छपाई सुरू होईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ११ मे पर्यंत बोर्डाचा निकाल पूर्ण होईल. बारावीचा निकाल १३ किंवा १४ मे रोजी, तर दहावीचा निकाल १६ मे पूर्वी जाहीर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सर्व उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झालीय. ८ दिवसांत गुणांची अंतिम पडताळणी पूर्ण होईल. बारावीचा निकाल १३ किंवा १४ मे तर, दहावीचा निकाल १५ किंवा १६ मे रोजी जाहीर होईल. यासंदर्भातील घोषणा शिक्षणमंत्री लवकरच करतील, असं पुणे विभागीय मंडळाचे अध्यक्ष औदुंबर उकिरडे म्हणाले.