महाराष्ट्र

HSRP नंबरप्लेट बसवण्यासाठी नवीन डेडलाईन;परिवहन आयुक्तांचा निर्णय

उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी म्हणजेच HSRP (High Security Registration Number Plate) बसवण्यासाठी नवीन डेडलाईन जारी करण्यात आली आहे. 30 जूनपर्यंत ही नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत अतिशय थोड्याच वाहनांना HSRP बसवून झाल्याने परिवहन आयुक्तांनी 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. ही नंबर प्लेट बसवण्याच्या निर्णयावरुन अनेक वाद उद्भवले होते.

दरम्यान, राज्य सरकार जास्तीचे पैसे आकारत असण्यावरुन सरकारवर टीका देखील झाली होती. सध्या 30 मार्च नंतर 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती, आता तिसरी मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत अंदाजे 18 लाख गाड्यांनी HSRP बसवल्याचा अंदाज आहे.

HSRP नंबरप्लेट रजिस्टर कसं करायचं
01 एप्रिल 2025 नंतर राज्यातील सर्व वाहनांना हाय सेक्युरिटी नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आलंय. यासाठी रजिस्टेशन नेमकं कसं करायचं, त्याची प्रोसेस काय समजून घेऊयात. 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या सर्व जुन्या वाहनांना आता 31 मार्चपर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (एचएसआरपी) सक्तीची करण्यात आलेली आहे. त्यासाठी राज्यभरात तीन खासगी एजन्सींची नेमणूक करण्यात आली आहे. नागरिकांना ऑनलाइन प्रक्रिया करून तसेच आपल्या शहरातील असलेल्या अधिकृत केंद्रामध्ये ती बसवून घेता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला गुगलवर hsrp number plate असं सर्च करायचं आहे. त्यानंतर सर्वात वर तुम्हाला महाराष्ट्र शासनाची वेबसाईट transport.maharashtra.gov.in आली असेल. त्यावर क्लिक करा.. त्यानतंर तुमच्या समोर होम पेज आलं असेल. आता तुमच्यासमोर Apply High Security Registration Plate Online असं पेज आलं असेल. त्यानंतर खाली तुम्हाला ऑफीस सर्च सिलेक्ट करायचं आहे. आता तुमच्यासमोर तीन पर्याय आले असतील. पण तुम्हाला APPLY HSRP यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला Order HSRP यावर क्लिक करायचं… त्यानंतर तुम्हाला येथे गाडीचं Registration Number.. चेसीस नंबरचे शेवटचे पाच अंक इंजिन नंबरचे शेवटचे पाच अंक आणि मोबाईल नंबर टाकायचं आहे. त्यानंतर पेमेंट करण्यासाठीचं पेज ओपन होईल.

नंबर रजिस्टर करण्यासाठी किती पैसे मोजावे लागणार?
दुचाकी, ट्रॅक्टर 450
तीनचाकी 500
चारचाकी, अन्य वाहने 745

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *