संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट,वॉन्टेड आरोपींच्या मुसक्या आवळल्या
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलीस अॅक्शनमोडमध्ये आले आहेत. काही दिवसांपूर्वी या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडने सीआयडीसमोर सरेंडर केलं होतं.
पण या प्रकरणातले तीन आरोपी अजूनही फरार होते. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी परिपत्रकही जारी केलं होतं. आता संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मोठी अपडेट समोर आली आहे. आता पोलिसांनी या प्रकरणात तीन आरोपींना अटक केली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी प्रमुख आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याशिवाय हत्येच्या दिवशी संतोष देशमुख यांचं लोकेशन देणाऱ्या आणखी एका संशयितालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. असं एकूण तिघाजणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला अपहरण करून हत्या केल्यानंतर हे सर्व आरोपी फरार होते, आता पोलिसांनी एका संशयितासह दोन फरार आरोपींना अटक केली आहे. तिन्ही आरोपींना पोलिसांनी पुण्यातून बेड्या ठोकल्याचं सांगितलं जात आहे.
बीड पोलिसांच्या विशेष पथकानं सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना अटक केली आहे. आरोपींना आता पुढील तपासासाठी सीआयडीकडे सुपूर्द केलं जाणार आहे. याबाबतचं प्रसिद्धी पत्रक लवकरच पोलीस विभागाकडून काढण्यात येणार आहे. आरोपींनी 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचं अपहरण केलं होतं. त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या केली होती. हत्येच्या या घटनेनंतर सर्व आरोपी फरार होते. आता बीड पोलिसांना मोठं यश आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणातील दोन मुख्य आरोपी आणि एका संशयिताला बेड्या ठोकल्या आहेत.