केंद्र सरकारकडून घर घेण्यासाठी मदत;प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ कसा मिळेल!
घर घ्यायचं म्हटलं तरी पोटात गोळा येतो. आता घराचे EMI ही खिशाला परवडणारे नाहीत. घर कसं घ्यायचं आणि ऐवढे पैसे कुठून आणायचे, तरीही प्रत्येकचं घर घ्यायचं स्वप्न असतंच, हे स्वप्न पूर्ण करायला आता मोदी सरकार मदत करणार आहे.
आता तुमच्या स्वप्नातलं घर घेण्यासाठी आता सरकार मदत करणार. सरकारकडून 2.30 लाख रुपये मदत मिळणार आहे. यासाठी तुमच्या नावावर फक्त घर असू नये ही एकच अट आहे. तुम्हाला हे पैसे कुठे आणि कसे मिळणार याबाबत सविस्तर जाणून घेऊया.
तुम्हालाही घर खरेदी करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ कसा घेता येईल याची माहिती सांगणार आहोत. पीएम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना-शहरी (PMAY-U 2.0) चा दुसरा टप्पा सुरू केला आहे.
या योजनेंतर्गत पुढील पाच वर्षांत एक कोटीहून अधिक शहरी कुटुंबांना घरे बांधण्यासाठी, खरेदी करण्यासाठी किंवा भाड्याने देण्यासाठी आर्थिक मदत दिली जाईल. केंद्र सरकार घर खरेदीसाठी मदत करणार आहे.
सरकारचा काय आहे प्लॅन?
या योजनेअंतर्गत केंद्र सरकार 2.30 लाख कोटी रुपयांची मदत करणार आहे. पहिल्या टप्प्यात 1.18 कोटी घरांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी 85.5 लाख घरे बांधून पात्र लाभार्थ्यांना सुपूर्द करण्यात आली आहेत. PMAY-U चे मुख्य उद्दिष्ट शहरी भागातील पात्र लाभार्थ्यांना सर्व सुविधांसह ‘पक्की’ घरे देण्याचा मानस आहे.
PMAY 2.0 अंतर्गत एक लाख नवीन घरे बांधली जातील. या प्रत्येक घरासाठी ₹ 2.30 लाख अनुदान दिले जाईल. याशिवाय, लाभार्थी-लेड कन्स्ट्रक्शन (BLC), भागीदारीतील परवडणारी घरे (AHP), परवडणारी भाड्याने घरे (ARH) आणि व्याज अनुदान योजना (ISS) यासारखे आणखी बरेच मुद्दे या योजनेत समाविष्ट केले आहेत.
PMAY 2.0 साठी अर्ज कसा करावा?
सर्व प्रथम अधिकृत वेबसाइट pmay-urban.gov.in वर जा.
होमपेजवर ‘Apply for PMAY-U 2.0’ पर्यायावर क्लिक करा.
सर्व मार्गदर्शक तत्त्वे आणि सूचना काळजीपूर्वक वाचा.
वार्षिक उत्पन्न आणि इतर माहिती लिहा. तुमची पडताळणी करा.
आधार कार्ड माहिती सत्यापित करा.
अर्जामध्ये पत्ता, उत्पन्नाचा पुरावा आणि इतर आवश्यक माहिती भरा.
फॉर्म सबमिट करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचा. अर्जाची स्थिती पोर्टलवर देखील ट्रॅक केली जाऊ शकते. अर्जदारांनी वेळेवर अर्ज करावा
आणि पोर्टलवर त्यांच्या अर्जाची स्थिती नियमितपणे तपासत राहण्याचा सल्ला दिला जातो.
PMAY 2.0 आवश्यक कागदपत्र
अर्ज केलेली कागदपत्र आणि कुटुंबातील सदस्यांचं आधारकार्ड
आधार कार्ड बँक खात्याला लिंक असावं, या बँक खात्याचे डिटेल्स द्यावेत
तुमचा उत्पन्नाचा दाखला
जातीचा दाखला
जमीन किंवा घर विकत घेणाऱ्याचे कागदपत्र